शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केल आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
4
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
5
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
6
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
7
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
8
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
10
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
11
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
12
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
13
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
14
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
15
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
17
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
18
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
19
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:44 IST

कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला

- पांडुरंग मरगजेधनकवडी  : अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खुन करुन पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या ३६ तासाच्या आत पश्चिम बंगाल मधून ताब्यात घेतले असून बिरण सुबल करकर, ऊर्फ बिरण सुबल कर्माकर, (वय ३० वर्षे, रा, पश्चिम बंगाल) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे. तर नयन गोरख प्रसाद, (वय ४५ वर्षे, रा, जि. सिवान, ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.आंबेगाव पठार येथील चिंतामणी चौकात बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यावर अज्ञात इसमाचा, कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला होता.वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना मयत इसमाची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेणे बाबतच्या सुचना दिल्या.वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळून आलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यावरुन मयत इसमाचे नाव आणि पत्ता निष्पन्न झाले, त्या नंबर मयतच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये मयत इसमाचे सोबत बिरण सुबल करकर, ऊर्फे बिरण सुबल कर्माकर, हा इसम असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली,दरम्यान बिरण सुबल करकर, ऊर्फ बिरण सुबल कर्माकर याचा शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहीती मिळताच वरीष्ठांचे मार्गदर्शनखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल येथे जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो हावडा रेल्वे स्टेशन भागातून अटक करण्यात आली आहे.दारु पिल्यानंतर मती फिरली, एकाने दुसर्‍या च्या पत्नीवर कॉमेंट केले, त्यामुळे झालेल्या वादात खोलीतील लोखंडी पहारीने वार करुन खुन करुन आरोपी पळून गेला. दोन दिवसानंतर वास येऊ लागल्यावर खून झाल्याचे उघडकीस आले. परंतु, खुनाची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनतर मृतदेह सडू लागल्याने त्याची ओळख पटू शकत नव्हती. खुन झालेला कोण आणि आरोपी कोण याचा काही पत्ता लागत नव्हता. अशावेळी पोलिसांच्या मदतीला धावून आला रक्ताने माखलेला एक मोबाईल. रक्ताने माखलेला मोबाईलच बोलला आणि मृताची ओळख पटली अन आरोपीचे नाव समजले. भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाऊन आरोपीला पकडून आणले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक