वडकी खून प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:42+5:302021-02-05T05:11:42+5:30

तुषार खंडू चव्‍हाण (वय २१ रा.वडकी, गायदरा, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमोल उर्फ पप्या ...

Accused in Wadaki murder case arrested in 48 hours | वडकी खून प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

वडकी खून प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

तुषार खंडू चव्‍हाण (वय २१ रा.वडकी, गायदरा, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमोल उर्फ पप्या विष्णू जाधव (वय ३०), अमित उर्फ दत्ता विष्णू जाधव (वय ३३) आणि कालीदास उर्फ सागर मल्हारी जाधव (वय २७, सर्व रा. गायदरा, वडकी, ता.हवेली) यां तिघांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि २७) जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास पुणे - सासवड राज्यमार्गावरील वडकी (ता हवेली) येथील हिंदवी स्नॅक्स येथे तुषार चव्‍हाण व त्याचा मित्र फिर्यादी शुभम बापू पवार (वय २१, रा. वडकीनाला, ता. हवेली) हे चहा पित होते. यावेळी अमोल, अमित, कालीदास जाधव व एक अनोळखी हे दोन दुचाकी वरून तेथे आले. जुन्या घरगुती भांडणाचे कारणावरून त्यांनी चिडून शुभम यास पाठीमागून धरून पोटाला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली. इतर तिघांनी तुषार याचे डोक्यात व पोटावर कोयता, लोखंडी राॅड व चाकुने वार करून त्याचा खुन केला. यानंतर ते दुचाकीवरून हडपसर बाजूकडे पळून गेले. पोलीसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

आरोपींचा शोध घेण्यासाठी लोणीकाळभोर पोलीस आणि गुन्हेशाखेच्या पथके नेमण्यात आली होती.

या पथकाने घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली होती. त्याप्रमाणे आजूबाजूचे गावातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. आरोपीचा जाणे येण्याचा मार्ग याबाबत स्थानिक गावकऱ्यांकडे चौकशी केली होती. त्यातूनच गुन्हे शाखेचे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन गुन्हयातील वरील तिघांना आळंदी फाटा, लोणीकंद (ता हवेली) येथे साध्या वेशात सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगून गुन्हा करताना त्यांचेसोबत मंगेश बाळासाहेब चव्हाण ( रा. नांदोशी ता.हवेली. सध्या राहणार भेकराईनगर हडपसर पुणे ) हा असल्याचे सांगितले आहे.या तिघांना पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. यातील आरोपी मंगेश चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हवेली पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल आहे.

Web Title: Accused in Wadaki murder case arrested in 48 hours