शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:31 IST

१२ तासांनंतर पोलिस म्हणाले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, आंदोलक न्यायालयाकडे दाद मागणार

पुणे : पोलिसांनी कोथरूड ठाण्यात तीन मुलींना जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल १२ तासांपेक्षा जास्त वेळ घेऊन ही घटना वस्तुस्थितीवर आधारित नसून गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आता आंदोलकांकडून होत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून एक विवाहित तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली. मैत्रिणींच्या मदतीने कोथरूड येथे राहणाऱ्या तीन तरुणींच्या फ्लॅटमध्ये तिने आश्रय घेतला आणि काही काळाने निघूनही गेली. याच कारणामुळे, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पुण्यात येऊन कोथरूड पोलिसांच्या मदतीने वॉरंट नसतानाही मुलींच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यांनी मुलींच्या सामानाची तपासणी केली आणि त्यांना कोथरूड पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत पाच तास बसवून ठेवले. या खोलीत त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला.

या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी या मुलींसह रोहित पवार, सुजात आंबेडकर यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते रविवारी मध्यरात्रीनंतरही पोलिस आयुक्तालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. आमदार पवार यांनी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांकडून लेखी देण्यात आले आहे.

‘तो’ साध्या वेशातील कोण?

कोथरूड येथील मुलींच्या फ्लॅटवर पोलिसांसोबत एक साध्या वेशातील व्यक्तीदेखील आली होती, अशी माहिती मुलींनी दिली. ती व्यक्ती कोण? महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलिस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या, पोलिस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत, या व्यक्ती पोलिस दलातील कुणाशी संबंधित आहेत? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

पोलिसांचे म्हणणे काय?.

मुलीच्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना ही वस्तुस्थितीवर आधारित नसून यामध्ये तथ्य दिसून येत नाही. त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नसल्याचे पत्र कोथरूड पोलिसांनी मुलींना दिले आहे. सोमवारी (दि. ४) पहाटे अडीचच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात धरणे धरून बसलेल्या मुलींना कोथरूड पोलिसांनी हे पत्र दिले आहे. पहाटे २ वाजता या मुलींकडून तक्रार अर्ज घेण्यात आला. त्यानंतर पहाटे अडीच वाजता कोथरूड पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाला उत्तर दिले. पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या पत्रानुसार तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना/घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय संहिता/अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे.

आयुक्तांकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी कोथरूडप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. पोलिस मुलींचा छळ करतात, त्यांचा विनयभंग करतात. त्यांना जातीवाचक शिव्या देतात; पण आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिस आयुक्तालयापासून सगळी पोलिस यंत्रणा ॲट्रॉसिटीची साधी तक्रारही घेत नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले.

पोलिसांवर दबाव कुणाचा?

कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली. यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. यावेळी पोलिसांवर कुणाचा दबाव होता का, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का?

आज पुढील भूमिकेबाबत ठरणार.

पोलिसांकडे आमचे अजूनही ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यावा असे म्हणणे आहे. अन्यथा पुढील कायदेशीर बाबींसंदर्भात आम्ही चर्चा करत आहोत. न्यायालयात जाण्याची वेळ आली तर काय यासंदर्भात मार्गदर्शन घेत आहोत. मंगळवारी आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करू.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकCourtन्यायालयVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीRohit Pawarरोहित पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर