शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

‘मोक्का’तील फरार आरोपी पिस्तुलासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 8:25 PM

नातेवाईकांना भेटण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीच्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देएक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुसे असा मोटारीसह ३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत

पुणे : ‘मोक्का’तील फरार आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले आहे. मागील दोन वर्षांपासून फरार होता. बापू रामदास मळेकर (वय ३२, रा. वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. वैकुंठ स्मशानभूमीत सापळा रचून त्याला पकडण्यात आले. मळेकर नातेवाईकांना भेटण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीच्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरोपी ज्या स्विफ्ट मोटारीमधून आला होता, तिची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुसे असा मोटारीसह ३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याला अटक करण्यात येऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट व मुंबई पोलीस अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर बारामती पोलीस ठाण्यात दरोडा, खंडणी, दुखापत, गर्दी-मारामारी आदी गुन्हे दाखल आहेत. खडक पोलीस ठाण्यातील एका गुन्हयात तो २०१६ पासून फरार आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त बसवराज तेली (परिमंडल १) सहायक पोलीस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी शरद वाकसे, बाबा दांडगे, संजय बनसोडे, धीरज पवार, सचिन जगदाळे, चेतन शिरोळकर, राहुल पवार, सुधीर भिलारे यांनी केली.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक