Pune Police: पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्कातील आरोपी पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:22 IST2023-02-02T14:19:13+5:302023-02-02T14:22:38+5:30

आरोपीवर खूनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे असे गंभीर गुन्हे

Accused in Mokka escaped after giving a truncheon to the Pune police | Pune Police: पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्कातील आरोपी पसार

Pune Police: पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्कातील आरोपी पसार

बिबवेवाडी : मार्केटयार्डमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून २८ लाख रुपये लुटून नेणाऱ्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी नुकतीच मोक्काची कारवाई केली होती. या टोळीतील एक जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. संतोष बाळु पवार (वय २३, रा. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे.

मार्केटयार्ड परिसरात दिवसा ढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून २८ लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता  व त्याच्या टोळीने टाकला होता. १२ नोव्हेंबर रोजी अंगडियाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी हा दरोडा टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडले आहे. 

अविनाश गुप्ता टोळीने अवैध मार्गाने धमकी देऊन, जुलुम जबरदस्ती करणे, खूनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे असे अनेक गंभीर गुन्हे केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर करण्यात आला होता. हे सर्व जण पोलीस कोठडीत असताना त्यातील संतोष पवार हा बुधवारी सायंकाळी पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. मार्केटयार्ड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Accused in Mokka escaped after giving a truncheon to the Pune police