Pune Crime: उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलवले अन् चाकूने केला वार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:49 AM2024-02-29T09:49:20+5:302024-02-29T09:51:00+5:30

महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली....

accused called him on the pretext of returning the money and stabbed him with a knife | Pune Crime: उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलवले अन् चाकूने केला वार

Pune Crime: उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलवले अन् चाकूने केला वार

पुणे : उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलवून घेत महिलेकडून एकावर चाकूने वार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली. याप्रकरणी राहुल दशरथ जाधव (२९, रा. उबरे, ता. भोर) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार द्रौपदी काशीनाथ तेलोरे (३३, रा. कोथरूड) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल जाधव आणि आरोपी ओळखीचे आहेत, फिर्यादी यांनी आरोपीला ८ हजार ६०० रुपये उसने दिले होते. आरोपीने फिर्यादी राहुल जाधव यांना उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलवून घेत शिवीगाळ करत चाकूने पाठीवर वार करून जखमी केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळी करत आहेत.

Web Title: accused called him on the pretext of returning the money and stabbed him with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.