शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

सणसवाडी येथे बंदुकीच्या धाकाने लुटणाऱ्यांना फिर्यादीनेच पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 6:07 PM

आरडाओरड्यानंतर पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग..

ठळक मुद्देबंदूक रोखून तुझ्याजवळ असलेला माल काढून दे असे धमकावले

कोरेगाव भीमा : पुणे नगर महामार्गालगत बंदुकीच्या धाकाने लुटणाऱ्या तिघांपैकी एकास फिर्यादीनेच पकडले. सणसवाडी येथे ही घटना घडली. फिर्यादीच्या धाडसाचे पोलिसांकडून कौतुक होत आहे.  सोपान चोपडे (रा.सणसवाडी,ता.शिरूर)यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोपडे हे तिरंगा हॉटेलमध्ये जेवण करून जात असताना पाठीमागून तीन युवक दुचाकीहून आले. तिघांपैकी एकाने चोपडे यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. बंदूक रोखून तुझ्याजवळ असलेला माल काढून दे असे धमकावले. चोपडे यांनी आरडाओरडा सुरु करताच तिघेजण घाबरून पळून जाऊ लागले. मात्र नंतर चोपडे यांनी शिताफीने तिघांचा पाठलाग केला. पाठलाग करत असल्याचे पाहून गडबडीत असलेले चोरटे दुचाकी घसरल्याने खाली पडले. आरडाओरडा झाल्याने शेजारील नागरिकांनी एका युवकाला पकडले तर दोघे पळून गेले. चोपडे व नागरिकांनी पकडलेल्या युवकाकडून नकली बंदूक व स्प्रे काढून घेवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.   अशोक ढाकणे (रा.काटेवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी त्याच्यासह अज्ञात दोन युवकांवर गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस