the accused arrested who robbers by showing pistol At Sanaswadi | सणसवाडी येथे बंदुकीच्या धाकाने लुटणाऱ्यांना फिर्यादीनेच पकडले

सणसवाडी येथे बंदुकीच्या धाकाने लुटणाऱ्यांना फिर्यादीनेच पकडले

ठळक मुद्देबंदूक रोखून तुझ्याजवळ असलेला माल काढून दे असे धमकावले

कोरेगाव भीमा : पुणे नगर महामार्गालगत बंदुकीच्या धाकाने लुटणाऱ्या तिघांपैकी एकास फिर्यादीनेच पकडले. सणसवाडी येथे ही घटना घडली. फिर्यादीच्या धाडसाचे पोलिसांकडून कौतुक होत आहे.  
सोपान चोपडे (रा.सणसवाडी,ता.शिरूर)यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोपडे हे तिरंगा हॉटेलमध्ये जेवण करून जात असताना पाठीमागून तीन युवक दुचाकीहून आले. तिघांपैकी एकाने चोपडे यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. बंदूक रोखून तुझ्याजवळ असलेला माल काढून दे असे धमकावले. चोपडे यांनी आरडाओरडा सुरु करताच तिघेजण घाबरून पळून जाऊ लागले. मात्र नंतर चोपडे यांनी शिताफीने तिघांचा पाठलाग केला. पाठलाग करत असल्याचे पाहून गडबडीत असलेले चोरटे दुचाकी घसरल्याने खाली पडले. आरडाओरडा झाल्याने शेजारील नागरिकांनी एका युवकाला पकडले तर दोघे पळून गेले. चोपडे व नागरिकांनी पकडलेल्या युवकाकडून नकली बंदूक व स्प्रे काढून घेवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.  
 अशोक ढाकणे (रा.काटेवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी त्याच्यासह अज्ञात दोन युवकांवर गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: the accused arrested who robbers by showing pistol At Sanaswadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.