शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:39 PM

तुम्ही लोण्यात बनावट तेल भेसळ करता, हे मोठ्या साहेबांना सांगतो, असे सांगून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती़.

ठळक मुद्देकोंढव्यातील व्यापाऱ्याचे अपहरण करुन उकळली होती खंडणी

पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या ७ महिन्यांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला दरोडा प्रतिबंधक विभागाने पकडले आहे़. अमित कांता चोरगे असे त्याचे नाव आहे़. अमित चोरगे याने कोंढव्यातील एका व्यापाऱ्याला तुम्ही तुपात भेसळ करता, मला ५० हजार रुपये खंडणी द्या नाहीतर तुमची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करेन, अशी धमकी दिली होती़. याप्रकरणी सुनिल तिवारी (रा़ कोंढवा) कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. तिवारी यांचा लोणी बनविण्याचा कारखाना आहे़. १६ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ते घरात असताना चार अनोळखी कारखान्यात आले़. त्यांनी त्यांचा नोकर रमेशचंद्र गुप्ता याला तुझा मालक कुठे आहे असे विचारले़. त्यांच्यातील एकाने तिवारी यांना घरातून बोलवून कारखान्यावर नेले़ व शटर बंद करुन घेतले़. त्यांना तुम्ही लोण्यात बनावट तेल भेसळ करता, हे मोठ्या साहेबांना सांगतो,असे सांगून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती़. त्यांनी त्यास नकार दिल्यावर त्यांना गाडीत बसून कात्रज, धनकवडीत भागात फिरविले़. आपली सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी ३५ हजार रुपये त्यांना दिले होते़. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता़. त्यात कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौघांना अटक केली होती़. चोरगे तेव्हापासून फरार होता़. तो महमंदवाडी येथील रेल्वे गेटजवळील मॅजेस्टीक सोसायटीजवळ येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाला मिळाली़. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले़. त्याच्यावर यापूर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल आहेत़.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस