पानशेत खून प्रकरणी आरोपींना अटक; खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी दिला होता फेकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 21:15 IST2022-10-17T21:13:55+5:302022-10-17T21:15:02+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने संबंधित व्यक्तीच्या गुन्हेगारांस अटक केली....

Accused arrested in Panshet murder case body was thrown in a secluded place | पानशेत खून प्रकरणी आरोपींना अटक; खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी दिला होता फेकून

पानशेत खून प्रकरणी आरोपींना अटक; खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी दिला होता फेकून

मार्गसनी (पुणे) : पानशेत धरण परिसरातील आंबेगाव बुद्रुक (ता. वेल्हे) येथील भागात अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी (ता.१२) रोजी दुपारी उघडकीस आला होता.

रविवार (ता.१६) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने संबंधित व्यक्तीच्या गुन्हेगारांस अटक केली आहे.

राहुल प्रकाश रावत (वय २८, रा. इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी संजय बाबुराव कडू देशमुख (वय ३६, रा. कुरण बु.), दत्तात्रय निवंगुणे (वय ४०, रा. आंबी, ता.वेल्हा) तसेच धनंजय सदानंद ढमाले (वय ३२, रा. अथर्व आपार्टमेंट, विठ्ठल मंदिर जवळ नवी पेठपुणे) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

Web Title: Accused arrested in Panshet murder case body was thrown in a secluded place