Accident: जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:04 IST2022-05-31T13:04:10+5:302022-05-31T13:04:21+5:30
मोरगाव - जेजुरी रस्त्यावर दुचाकीने धडक दिल्याने अपघाती मृत्यू

Accident: जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू
मोरगाव : जेजुरी येथे देवदर्शन करून मित्रांसमवेत परतणाऱ्या तरुणाचा मोरगाव - जेजुरी रस्त्यावर दुचाकीने धडक दिल्याने अपघातीमृत्यू झाला. विनोद जाधव (३२, रा. भवानीनगर, ता. इंदापूर) असे अपघातातमृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मावडी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. २९) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. जेजुरीहून देवदर्शन करून चौघे मित्र परतीच्या वाटेवर होते. यावेळी मावडी गावाच्या हद्दीत चारही मित्र लघुशंकेसाठी थांबले. यावेळी दुचाकीने जोरदार ठोकर दिल्याने विनोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत असणाऱ्या मित्रांनी विनोद यांना उपचारासाठी मोरगाव येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलला नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. विनोद जाधव यांचा भवानीनगर (ता. इंदापूर) येथे फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. ते या परिसरातील प्रसिद्ध फोटोग्राफर होते.