शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

येवलेवाडीत काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात; 4 कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 17:57 IST

"इंडिया ग्लास" या काचेच्या कंपनीत आजची ही दुर्घटना घडली असून सदरील कामगार यांच्याबाबत कंपनीने कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे समोर आले आहे

कोंढवा : येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात झाला. यामध्ये चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर एका कामगारावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३), अमित शिवशंकर कुमार (वय २७ सर्व रा. येवलेवाडी  मूळ- उत्तरप्रदेश) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. घटनेत मोनेसर कोळी (वय ३१) आणि जगतपाल संतराम कुमार (वय ४१) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना रूग्णालयात दाखल केले. जगतपाल कुमार या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून मोनेसर कोळी या कामगारावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान,  संबंधित इंडिया ग्लास सोलुशन ही कंपनी हुसेन तय्यबअली मिठावाला यांच्या मालकीची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

येवलेवाडी येथे दुपारी एक ते दीडच्या दरम्यान एका काचेच्या कारखान्यात माल उतरताना काचा फुटल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व कामगारांना गंभीर अवस्थेत बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्या सहा कामगारांपैकी चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून एका कामगारावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 

येवलेवाडी येथील भागात अनेक कंपन्या असून अधीकहुन कंपन्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे."इंडिया ग्लास" या काचेच्या कंपनीत आजची ही दुर्घटना घडली असून सदरील कामगार यांच्याबाबत कंपनीने कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. येवलेवाडीतील काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात झाला त्यात चार कामगारांचा मृत्यू परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. 

सदरील कामगारांकडे हॅन्ड ग्लोज, शूज, कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट आढळून आले नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, अशा अनेक राज्यातून येवले वाडी येथील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामगारांची भरती केली जाते, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची "सेफ्टी" कंपन्यांकडून दिली जात नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चंदन ग्लास ( येवलेवाड़ी ), सफायर ग्लास ( येवलेवाड़ी ), भोरेखान ग्लास ( कोंढवा ) या व अशा अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या कोंडवा येवलेवाडी भागात असून सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.

सदर घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. त्यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला असून इतर कामगारांना दवाखान्यात दाखल केले आहे. घटना का व कशी घडली याचा तपास सुरू आहे. - विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन

सदर घटनास्थळी काच उतरवत असताना काचा असलेले बॉक्स अंगावर पडुन त्याखाली कामगार अडकले होते.क्रेन च्या साह्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर कामगारांना बाहेर काढून हॉस्पिटल मध्ये रवाना केले.त्यामधे 4 कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जणांची जणांची प्रकृती गंभीर असून एक इसम जखमी आहे.-  समीर  बशीर शेख, स्टेशन ड्युटी ऑफिसर, अग्निशामक दल

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाDeathमृत्यूEmployeeकर्मचारीhospitalहॉस्पिटलfireआगPoliceपोलिस