लोणीकंद पोलीस स्टेशन समावेशाच्या प्रक्रियेला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:12 IST2021-03-21T04:12:12+5:302021-03-21T04:12:12+5:30

लोणीकंद पोलिस स्टेशन मंजूर मनुष्यबळासह पुणे शहर पोलीस हद्दीत समाविष्ट करण्यात शासन मान्यता मिळाली असल्याने शहर पोलीस दलाकडून समावेशाच्या ...

Accelerate the process of inclusion of Lonikanda police station | लोणीकंद पोलीस स्टेशन समावेशाच्या प्रक्रियेला वेग

लोणीकंद पोलीस स्टेशन समावेशाच्या प्रक्रियेला वेग

लोणीकंद पोलिस स्टेशन मंजूर मनुष्यबळासह पुणे शहर पोलीस हद्दीत समाविष्ट करण्यात शासन मान्यता मिळाली असल्याने शहर पोलीस दलाकडून समावेशाच्या प्रक्रीया वेगाने सुरू आहे. येत्या दोन दिवसांमध्ये लोणीकंद पोलीस स्टेशन शहर पोलीस दलात कार्यरत होणार असल्याची शक्यता आहे.

कायदेशीर प्रक्रिया व पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार मागील तीन महिन्यांपासून लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस हद्दीत समावेश होण्याची रखडलेली प्रक्रिया पूर्ण झाली असून १६ मार्च रोजी गृह विभागाने आदेश काढून दोन्ही पोलीस स्टेशन समावेशाला मान्यता दिली आहे. समावेसहाच्या आदेशानंतर पुणे शहर पोलीस दलाकडून समावेशाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. झोन-४ चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भेट देऊन आवश्यक प्रक्रियेबाबत माहिती व कारवाई सुरु केली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये (सोमवार, मंगळवार) लोणीकंद पोलीस स्टेशनचा कार्यभार पुणे शहर पोलीस शहर हद्दीतून होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया :

लोणीकंद पोलीस स्टेशन शहर हद्दीत समावेशाची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच कारवाई पूर्ण होईल. - पंकज देशमुख (पोलीस उपायुक्त)

Web Title: Accelerate the process of inclusion of Lonikanda police station