फेरीवाल्यांना शिवीगाळ; पुण्याच्या M.G. रोडवरील महिला पोलिसांचा व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 11:42 IST2026-01-19T11:41:40+5:302026-01-19T11:42:29+5:30
Pune News: पुणे शहरातील गजबजलेल्या एम.जी. रोड परिसरात महिला पोलिसांच्या कथित अरेरावीचा प्रकार समोर आलाय. फुटपाथवर दुकान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांना महिला पोलिस कर्मचाऱ्यांने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय.

फेरीवाल्यांना शिवीगाळ; पुण्याच्या M.G. रोडवरील महिला पोलिसांचा व्हिडीओ चर्चेत
पुणे शहरातील गजबजलेल्या एम.जी. रोड परिसरात महिला पोलिसांच्या कथित अरेरावीचा प्रकार समोर आलाय. फुटपाथवर दुकान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांना महिला पोलिस कर्मचाऱ्यांने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. शिवीगाळीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांशी या पोलिसांनी अपमानास्पद भाषा वापरल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडूनच अशी वर्तणूक होत असल्याने नेटकऱ्यांसह सामान्य नागरिकांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.