शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत संगीत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:03 IST

इंद्रायणी नगर परिसरात एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचे संगीत विषयाच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केले आहे

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघड झाली आहे. देहू फाटालगतच्या इंद्रायणी नगर परिसरात एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचे संगीत विषयाच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी संगीत शिक्षक गौरव माळी (वय २१) व संबंधित संस्था चालक महेश नरोडे (वय २७) या दोघांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नगर परिसरातील आनंदाश्रम वारकरी शिक्षण संस्थेत जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला. संगीत विषयाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याकडे शरीर सुखाची मागणी केली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने संस्थाचालकाला ही बाब सांगितली. मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर विद्यार्थ्याने दिघी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी संबंधित दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.                 वारकरी सांप्रदायाचे शिक्षण देऊन विद्यार्थी घडविणारे ठिकाण म्हणून आळंदीची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. आळंदी शहरासह आसपासच्या गावांमध्ये जवळपास तीनशेहून अधिक खाजगी वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहेत. मात्र अशा खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये थेट विद्यार्थ्यांवरच संस्थाचालक किंवा त्याच्या नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन अल्पवयीन मुलांवर पाहुणा म्हणून आलेल्या एकाने लैंगिक अत्याचार केले. तर महिन्याभरापूर्वी एका महाराजाकडून अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. या वाढत्या घटनांमुळे तीर्थक्षेत्र आळंदीची बदनामी होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.              यापार्श्वभूमीवर समस्त आळंदीकरांनी एकत्रित येत 'सर्व खाजगी वारकरी शिक्षण संस्था बंद कराव्यात' असा ठराव एकमताने मंजूर करून संबंधित विभागाला लेखी निवेदन दिलेले आहे. विशेषतः आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार प्रशासनाने आळंदी तसेच लगतच्या सर्व गावांमधील खाजगी शिक्षण संस्थांचा विशेष पथकाद्वारे सर्वे करून महिला व बाल विकास विभागाला अहवाल सादर केला आहे.             विशेष म्हणजे या सर्व्हेमध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. आळंदीतील अनेक खाजगी वारकरी शिक्षण संस्था महिला व बालविकास परवानगीविना सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. तर अनेक खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये सुविधांचा वाणवा असल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान या सर्वेचा अहवाल सादर करून जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. मात्र अद्याप संबंधित खाजगी वारकरी शिक्षण संस्थांवर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही.

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMolestationविनयभंग