कात्रज घाटात प्रवाशाचे घृणास्पद कृत्य; महिला रिक्षाचालकासमोर नग्न होऊन शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 15:11 IST2022-12-30T15:09:25+5:302022-12-30T15:11:40+5:30

महिला रिक्षा चालकाने त्याच्या तावडीतून पळ काढत स्वत:ची सुटका करत पोलीस ठाणे गाठले...

Abominable act of traveler at Katraj Ghat; Demanding physical pleasure naked front of female rickshaw driver | कात्रज घाटात प्रवाशाचे घृणास्पद कृत्य; महिला रिक्षाचालकासमोर नग्न होऊन शरीरसुखाची मागणी

कात्रज घाटात प्रवाशाचे घृणास्पद कृत्य; महिला रिक्षाचालकासमोर नग्न होऊन शरीरसुखाची मागणी

धनकवडी (पुणे) : प्रवाशी म्हणून रिक्षात बसलेल्या रिक्षा चालकाने रिक्षा कात्रज घाटात गेल्यावर रिक्षाचालक महिलेसोबत किळसवाणा प्रकार केला. त्याने अंगावरील सर्व कपडे काढून नग्न होत, महिलेशी शरीर संबंधासाठी जबरदस्ती केली. मात्र महिला रिक्षा चालकाने त्याच्या तावडीतून पळ काढत स्वत:ची सुटका करत पोलीस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी प्रवाशास अटक केली आहे. निखील अशोक मेमजादे ( वय ३० वर्षे, रा. शंकरमठ, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हांडेवारी परिसरात राहणारी ३८ वर्षीय महिला रिक्षा चालवते. ती २६ डिसेंबरच्या रात्री मगरपट्टा येथे ग्राहकाची वाट पहात थांबली होती. यावेळी निखील तीच्या रिक्षात प्रवाशी म्हणून बसला. त्याने कात्रज घाटात जायचे असल्याचे सांगितले. रिक्षा रात्री दहाच्या सुमारास कात्रज घाटात आल्यावर, त्याने एका लॉजिंगच्या बोर्डाजवळ रिक्षा थांबवायला सांगितली. यानंतर त्याने फिर्यादी महिलेला जेवणासाठी आग्रह केला. तिने नकार दिल्यावर तिच्या गालावर चापट मारली आणि शारीरीक संबंधाची मागणी केली.

प्रवाशी तिला म्हणाला, " मला इथेच तुझ्याशी शारीरीक संबंध ठेवायचे आहेत, या अंधारात तुझ्या मदतीला कोणीच येणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत स्वत:च्या अंगावरील सर्व कपडे काढले. यानंतर तिच्याशेजारी बसला. यामुळे फिर्यादी महिला प्रचंड घाबरली होती. यानंतर तिने रिक्षातून उतरुण पळ काढला, आरोपीनेही काही अंतरापर्यंत तीचा पाठलाग केला. यानंतर तीने एका पानटपरीवाल्याला गाठले. त्याची मदत घेऊन आरोपीला बाजूला ढकलले. यानंतर ती रिक्षा घेऊन घरी परतली. घाबरली असल्याने महिलेने उशिरा तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक केली. त्याने गुन्हयाची कबुली दिली असून तो शॉर्ट फिल्मची काम करत असल्याचे सांगतो. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्हि.जी.घोगरे करत आहेत.

Web Title: Abominable act of traveler at Katraj Ghat; Demanding physical pleasure naked front of female rickshaw driver