Pune Crime: महाळुंगे इंगळेत कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:10 IST2023-11-27T10:06:16+5:302023-11-27T10:10:17+5:30

सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे....

A youth was killed by stabbing a coyote in Mahalunge Pune Crime news | Pune Crime: महाळुंगे इंगळेत कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा खून

Pune Crime: महाळुंगे इंगळेत कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा खून

चाकण (पुणे) : चाकण औद्योगिक वसाहत मधील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्रीक्षेत्र महाळुंगे ( ता. खेड ) येथील गजबजलेल्या भर चौकात एका २४ वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला असून, एक जण गंभीर जखमी झाला असल्याची धक्कादायक घटना आज (दि.२६) सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रितेश संजय पवार ( वय.२४ वर्षे, रा. महाळुंगे, ता.खेड ) या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केल्याने आणि लाकडी दांडक्याने जबरी मारहाण झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर खून झालेल्या तरुणाचा मित्र संदेश भोसले याला मारहाण करण्यात आल्याने तोही जखमी झाला आहे.

चाकण तळेगाव महामार्गावरील रेणुका हॉटेल समोरील चौकात महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरील हा खून झाला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर आणि त्यांचे सहकारी दाखल झाले आहेत. फरारी आरोपींच्या शोधासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याची पोलिस पथके रवाना झाले आहेत.

Web Title: A youth was killed by stabbing a coyote in Mahalunge Pune Crime news