शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वीज पडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा, इंदापूरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:13 IST

युवकाला दोन बहिणी असून तो कुटुंबात एकुलता एक होता

इंदापूर : काटी गावच्या हद्दीतील भरतवाडी येथे मंगळवारी रात्री सहा वाजण्याच्या सुमारास वीज पडून शेतात काम करत असणा-या  २२ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. ओंकार दादाराम मोहिते (रा. भरतवाडी,काटी,ता. इंदापूर) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याचे चुलते तुकाराम भिवा मोहिते यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

 मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुकाराम मोहिते शेतातील काम करुन घरी येत होते. त्यांचा चुलत पुतण्या ओंकार मोहिते हा त्यांच्या शेतातील मक्याच्या पिकाला पाणी देत असताना त्यांना दिसला. वादळी वा-यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे त्यांनी ओंकारला घरी चल पाऊस येईल असे सुचवले. परंतू तुम्ही पुढे जा. तुमच्या पाठीमागे मी घरी येतो, असे ओंकार म्हणाला. मोहिते घरी आले. त्याच वेळी अचानक मोठ्याने विज कडाडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येवून पाहिले असता त्यांच्या भावकीतील एक जणाच्या शेताचे बांधावर असलेल्या नारळाच्या झाडाने पेट घेतल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी मोहिते,ओंकारचे वडील व इतर जण धावत शेतात गेले असता, ओंकात शेतात निपचित पडलेला दिसला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात आणण्यात आले. त्याला तपासून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दादाराम मोहिते यांना दोन मुली आहेत. ओंकार हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो पोलीस भरतीची तयारी करत होता. अत्यंत उत्साही अशा युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. चुलत्याचे ऐकून तो रानातून घरी आला असता तर त्याचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरRainपाऊसDeathमृत्यूFarmerशेतकरीPoliceपोलिस