शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार, तरुणीचा खून अन् बघ्यांची गर्दी; येरवड्यातील त्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:20 IST

व्हिडिओत आरोपी कृष्णा कनोजिया हातात कोयता घेऊन दिसत आहे. तर शुभदा कोदारी ही जखमी अवस्थेत खाली पडलेली दिसून येत आहे.

किरण शिंदेपुणे - येरवडा परिसरातील नामांकित कंपनीच्या आवारात तरुणाने सहकारी तरुणीवर कोयत्याने वार केले होते. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. शुभदा शंकर कोदारे (वय २८) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय ३०) याला अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आता एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये आरोपी कृष्णा कनोजिया हातात कोयता घेऊन दिसत आहे. तर शुभदा कोदारी ही जखमी अवस्थेत खाली पडलेली दिसून येत आहे. त्याशिवाय या ठिकाणी बघायची गर्दी देखील मोठी असल्याचे दिसून येते. 

येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही नामांकित कंपनी आहे.  आरोपी कृष्णा कनोजिया याने आर्थिक वादातून शुभदा हिच्यावर कोयत्याने वार केले होते. दरम्यान यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये शुभदा ही खाली पडलेली दिसत आहे. तर आरोपी कृष्णा हा कोयता घेऊन तिच्या अवतीभवती फिरताना दिसतोय. गंभीर जखमी अवस्थेतही शुभदाने झालेल्या प्रकाराची फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या जवळील फोनही आरोपीने हिसकावून घेतला. हा संपूर्ण प्रकार घडत असताना त्या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मात्र कोणीही कृष्णा याला अडवताना दिसत नाही. शेवटी आरोपी कृष्णा कनोजिया यांनी हातातील कोयता खाली टाकल्यानंतर नागरिक धावून आले. आणि त्याला मारहाण केली. 

दरम्यान शुभदा आणि आरोपी कृष्णा सहकारी होते. एकाच कंपनीत ते कामही करायचे. शुभदा हिने वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून कृष्णा याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच आरोपी कृष्णा याला शुभदा हिने वडिलांच्या आजारपणाचे खोटे कारण सांगून आपल्याकडून पैसे घेतल्याचे समजले होते. त्यामुळे उसने पैसे तो परत मागत होता. शुभदा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होती. त्यामुळे संतापलेल्या कृष्णा याने मंगळवारी कंपनीच्या आवारातच तिच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या शुभदा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयYerwadaयेरवडाyerwada policeयेरवडा पोलीसArrestअटक