Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, दागिने अन् पैसे लुबाडले

By नितीश गोवंडे | Updated: January 1, 2024 14:19 IST2024-01-01T14:19:40+5:302024-01-01T14:19:51+5:30

याप्रकरणी बारामती तालुक्यातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

A young woman was raped, robbed of jewelery and money by luring her into marriage | Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, दागिने अन् पैसे लुबाडले

Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, दागिने अन् पैसे लुबाडले

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन गेला. हा प्रकार १२ ते २३ डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत पीडित मुलीच्या नऱ्हे येथील घरी घडला आहे. याप्रकरणी बारामती तालुक्यातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सचिन पंडित जाधव (३३, रा. तरडवली, मोरगाव ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. १२ ते २३ डिसेंबर या कालावधीत शिवीगाळ व मारहाण करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित तरुणीच्या घरातील ७५ हजार रुपयांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये असा १ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लाड करत आहेत.

Web Title: A young woman was raped, robbed of jewelery and money by luring her into marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.