हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून अत्याचार
By नितीश गोवंडे | Updated: August 28, 2023 17:36 IST2023-08-28T17:35:49+5:302023-08-28T17:36:06+5:30
याप्रकरणाची कुठे वाच्यता केली तर तीचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारीत करण्याची धमकी

हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून अत्याचार
पुणे : विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक सत्तुजी टिक्कल (२८, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पीडीत तरुणीला अभिषेक टिक्कल याने विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलवले होते. पीडीत तरूणी हॉटेलमध्ये गेली असता टिक्कलने तिला जबरदस्तीने मद्य पाजले. तरूणीचा याचा त्रास झाल्याने टिक्कलने तिला जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केले, तसेच याप्रकरणाची कुठे वाच्यता केली तर तीचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारीत करण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गाताडे करत आहेत.