शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:24 IST

डंपरचालक कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला होता

पुणे: दुचाकीला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक तरुणीचा मृत्यू झाला, तर दुसरी तरुणी जखमी झाली. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात डंपरचालक राहुल भीमराव राठोड (२४, रा. भोंडवे वस्ती, रावेत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजल प्रकाश तायडे (२७, रा. तलासरी, जि. ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्राची जगन्नाथ पचांगे (२८, रा. डांगे चौक) हिने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १९) संध्याकाळी पाचच्या सुमरास प्राची आणि तेजल एका दुचाकीवरून गणेश मंदिर चौक येथून ज्युपिटर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होत्या. भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तेजल गंभीर जखमी झाली, तर प्राचीच्या हाताला, कपाळावर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान तेजलचा मृत्यू झाला. डंपरचालक राहुल हा कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केकाण करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातBanerबाणेरbikeबाईकPoliceपोलिसDeathमृत्यूWomenमहिला