प्रेमसंबंध तोडल्याचा राग तरुणीला शिवीगाळ, मारहाण; बालभारती ऑफिससमोरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 12:03 IST2024-04-27T12:03:09+5:302024-04-27T12:03:44+5:30

या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे....

A young woman is abused and beaten because of the breakup of a relationship; Incident in front of Balbharti office | प्रेमसंबंध तोडल्याचा राग तरुणीला शिवीगाळ, मारहाण; बालभारती ऑफिससमोरील घटना

प्रेमसंबंध तोडल्याचा राग तरुणीला शिवीगाळ, मारहाण; बालभारती ऑफिससमोरील घटना

पुणे : प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण केल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. या प्रकरणी एका रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. २५) दुपारी पावणे एकच्या सुमारास बालभारती ऑफिससमोर घडला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मिनाज इमामुद्दिन अहमद (२९, रा.दीप बंगला चौक, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी अहमदचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणी आरोपी अहमदसोबत बोलत नव्हती. याचा राग त्याच्या मनात होता. त्यानंतर त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. तो तिचा पाठलाग करू लागला.

प्रेमसंबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती ऑफिससमोर गाठले. आरोपी अहमद याने तरुणीला शिवीगाळ करून तिला हाताने मारहाण केली. मारहाणीनंतर घाबरलेल्या तरुणीने डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली.

Web Title: A young woman is abused and beaten because of the breakup of a relationship; Incident in front of Balbharti office