Pune Crime | पुण्यात मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 11:59 IST2022-12-28T11:56:58+5:302022-12-28T11:59:19+5:30
पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे...

Pune Crime | पुण्यात मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर गोळीबार
पुणे : मंडईतील गजबलेल्या रामेश्वर चौकात मंगळवारी रात्री एका तरुणावर गोळीबार करून कोयत्याने वार केल्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शेखर शिंदे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रामेश्वर चौकातून रात्री नऊच्या सुमारास शेखर शिंदे निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्याच्यावर कोयत्याने वार करून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.