Accident: टेम्पोला धडक बसल्याने अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:54 IST2022-03-29T15:54:44+5:302022-03-29T15:54:58+5:30
तरुणाला गंभीर दुखापत झाली असल्याने मृत्यू झाला

Accident: टेम्पोला धडक बसल्याने अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
शिवणे : शिवणे आणि माळवाडी मुख्य रस्त्यावर बापूजीबुवा बस थांबाजवळ दुचाकी आणि टेम्पोचा अपघात झाल्याची घटना मंगळवार दि. २९ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता घडली. अपघातात दुचाकी चालक तरूणाचा मृत्यू झाला आहे. साहील रेवणनाथ वाळुंज (वय, वर्षे 20 रा. साई रेसीडेन्सी, देशमुखवाडी शिवणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवणे एन.डी.ए मुख्य रस्त्यावरून साहील रेवनाथ वाळुंज हा मंगळवारी सकाळी त्याच्या दुचाकीवरून नर्हे येथे काॅलेजला निघाला होता. गणपती माथा येथे मोकळ्या मैदानाजवळ आला असता अचानक समोरून येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोला समोरून जोरदार धडक बसली. या अपघातात साहीलला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी शेजारील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.