जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाने केला महिलेचा खून; पुण्याच्या कळसमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 14:28 IST2022-08-25T14:28:10+5:302022-08-25T14:28:18+5:30

वालचंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली यांच्या फिर्यादीवरून अक्षय बाळु साठे (रा.जांब ता. इंदापुर जि. पुणे) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल

A young man murders a woman out of anger over an old feud Events at the climax of Pune | जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाने केला महिलेचा खून; पुण्याच्या कळसमधील घटना

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाने केला महिलेचा खून; पुण्याच्या कळसमधील घटना

कळस : जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एका तरुणाने ४५ वर्षीय महिलेच्या डोक्यात जबर मारहाण करून खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे घडली. संगीता पाडुरंग वाघमारे (वय ४५ वर्षे मुळ रा. वडजल ता.माण जि.सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वालचंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली यांच्या फिर्यादीवरून अक्षय बाळु साठे (रा.जांब ता. इंदापुर जि. पुणे) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २३ रोजी रात्री दहाच्या सुमारास संगीता वाघमारे व महेंद्र मच्छिंद्र गायकवाड यांच्यात भांडण झाले होते. सदर वादा वेळी संगीता वाघमारे यांनी गायकवाड यास शिवीगाळ केली होती. या भांडणाच्या कारणावरुन महेंद्र गायकवाड याचा नातेवाईक अक्षय बाळु साठे याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने संगीता वाघमारे यांच्या डोक्यात कोणतेतरी हत्यार मारुन जिवे ठार मारले. तसेच महिलेचे प्रेत येथील ऊस व बाजरीच्या पिकाच्या बांधाजवळ टाकुन दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली असून घटनेचा तपास पोलीस टीलकेकर करत आहेत. 

Web Title: A young man murders a woman out of anger over an old feud Events at the climax of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.