पुण्यात दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत महिलेचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 11:40 IST2022-03-31T11:37:28+5:302022-03-31T11:40:35+5:30
या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे...

पुण्यात दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत महिलेचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पुणे : विकत घेतलेले घर महिलेने सोडण्यासाठी तिला एका दाम्पत्याने शुक्रवारी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे.
लता श्रीकांत माने (वय ४७, रा. हिंगणे होम कॉलनी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वृषाली तानाजी बोडके व तानाजी नथू बोडके या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी बोडके याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सोनिया ओव्हाळ (वय ३२, रा. नवी पेठ) यांनी फिर्याद दिली. ही घटना कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनी येथे २५ मार्चला घडली आहे. सोनिया यांच्या ओळखीतील लता माने या हिंगणे होम कॉलनी परिसरात राहत होत्या, माने यांनी तानाजी बोडके यांच्या वडिलांकडून घर विकत घेतले होते.