पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप आणि रिक्षाच्या अपघातात महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:05 IST2023-06-06T19:02:14+5:302023-06-06T19:05:04+5:30

हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपास रस्त्यावर रविवारी पहाटे झाला...

A woman died in an accident involving a pickup and a rickshaw on the Pune-Nashik highway | पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप आणि रिक्षाच्या अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप आणि रिक्षाच्या अपघातात महिलेचा मृत्यू

मंचर (पुणे) : पिकअप गाडीने रिक्षाला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात महिला ठार झाली तर इतर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघातपुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपास रस्त्यावर रविवारी पहाटे झाला आहे. रजिया शकूर शेख (वय ४७, रा. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात अजिज चांद शेख (रा. चांदिवली कॉलनी, पुणे) यांनी फिर्याद दिली. अजिज चांद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिकअप चालक सुरज गंगाराम गायकवाड (रा. गायकवाड मळा, ता. कराड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार मांडवे करीत आहेत.

Web Title: A woman died in an accident involving a pickup and a rickshaw on the Pune-Nashik highway