पुण्यात दहा लाखांचा सेक्स टॉइजचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 08:42 AM2022-10-22T08:42:38+5:302022-10-22T08:45:01+5:30

१० लाखांच्या सेक्स टॉइजचा साठा जप्त...

A stock of sex toys worth ten lakhs seized in Pune | पुण्यात दहा लाखांचा सेक्स टॉइजचा साठा जप्त

पुण्यात दहा लाखांचा सेक्स टॉइजचा साठा जप्त

googlenewsNext

पुणे : ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून सेक्स टॉइजची विक्री होत असल्याचे उघडकीस आले असून, लष्कर पोलिसांनी गोदामावर छापा टाकून १० लाखांच्या सेक्स टॉइजचा साठा जप्त केला आहे.

दरम्यान, वेबसाइटवर सेक्सटॉइजची विक्री होत असल्याची माहिती लष्कर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. ही विक्री पुलगेट चौकीच्या बाजूला असलेल्या भाजी बाजारच्या गोदामातून होत असल्याचे कळताच तेथे जाऊन पोलिसांनी छापा टाकला असता तब्बल १० लाखांची खेळणी जप्त करण्यात आली.

एका वेबसाइटच्या माध्यमातून सेक्स टॉइजची विक्री सुरू होती; परंतु या वेबसाइटद्वारे खरेदी करणाऱ्याचे वय तपासून विक्री केली जात नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुलगेट येथील गोदामावर छापा टाकून दहा लाखांचे ऑफसीन मटेरिअल जप्त केल्याची माहिती लष्कर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

Web Title: A stock of sex toys worth ten lakhs seized in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.