नाना पेठ परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध
By विवेक भुसे | Updated: January 17, 2024 17:21 IST2024-01-17T17:21:35+5:302024-01-17T17:21:56+5:30
आरोपी कोंढवा व समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अग्नीशस्त्र, कोयता, तलवार अशा हत्यारांसह दहशत माजवित होता

नाना पेठ परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध
पुणे : नाना पेठ परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्याला स्थानबद्ध केले आहे. अमन युसूफ पठाण ऊर्फ खान (वय २२, रा. पटेल वाडा, नाना पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
अमन पठाण हा साथीदारांसह कोंढवा व समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अग्नीशस्त्र, कोयता, तलवार अशा हत्यारांसह दहशत माजवित होता. शस्त्राने दुखापत करणे, खूनाचा प्रयत्न करणे असे मागील २ वर्षात त्याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्याने परिसरातील नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे पाठवला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी त्याची पडताळणी करुन अमन पठाण याला एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत आतापर्यत ८५ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.