सॉफ्टवेअर इंजिनिअरचे ऑफिसमध्ये प्रेम जुळले, लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:49 IST2024-03-19T13:48:43+5:302024-03-19T13:49:38+5:30
लग्नाचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या आरोपीने महिला सहकाऱ्यावर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे

सॉफ्टवेअर इंजिनिअरचे ऑफिसमध्ये प्रेम जुळले, लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
पुणे : ऑफिसमधील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या आरोपीने महिला सहकाऱ्यावर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाऊद युसूफ दर (२७, कोरेगाव पार्क, मूळ बारामुल्ला, काश्मीर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते १७ मार्च दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी दाऊद हे एकाच कंपनीत कामाला आहेत. आरोपीने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच हॉटेल मधील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निमकर करीत आहेत.