पुणे: छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती त्यांच्या जन्मस्थळी अर्थातच पुरंदर किल्ल्यावर आज तीनशे अडुसष्ठावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्तानं पुरंदर किल्ल्यावर शंभू प्रेमींनी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. किल्ल्यावर आज शासकीय जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली. उद्योगमंत्री उदय सामंत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी स्थानिक आमदार विजय बापू शिवतारे आदी उपस्थित होते. यावेळी अपघातात जखमी आलेल्या तरुणीला विजय शिवतारे यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात घेऊन गेले.
पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर हेलिकॅप्टर पर्यंत आशिष शेलार यांना सोडून विजय शिवतारे परत सासवडकडे जात होते. सासवड नसरापूर या मार्गावर दुचाकीचा अपघात झाला होता. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अपघातग्रस्तांना स्वतःची गाडी थांबवून मदत केली. या अपघातात एका तरुणी गंभीर जखमी झाली होती. या जखमी तरुणीला विजय शिवतारे यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात घेऊन गेले.
सकाळपासूनच संख्येनं शंभूप्रेमी, पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं आज पुरंदर किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला. हजारोंच्या संख्येनं आलेल्या शंभू प्रेमींनी आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. मागील सोळा वर्षांपासून पुरंदर किल्ल्यावर पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. आता शासनाच्या वतीनं सुद्धा संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.