शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 14:46 IST

सरकारने कष्टाळू,दयाळू व मायाळू शेतकऱ्याला झिटकारु नये, शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल

इंदापूर : शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. कष्टाळू,दयाळू व मायाळू असणा-या शेतकऱ्याला जर झिटकारले तर शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये, असा सज्जड इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी (दि.१८) वरकुटे बुद्रुक येथे बोलताना दिला.

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने ते तेथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गाईच्या दुधाला ७५ रुपये तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ती मान्य झाल्यास महागाई निश्चितपणे कमी होईल. रयत क्रांती संघटनेने दि. २२ मे रोजी काढलेल्या यात्रेमध्ये दूध दरवाढीचा विषय आम्ही लावून धरला होता. त्याच्या अनुषंगाने दुधाच्या प्रश्नावर २२ जून रोजी पुण्यात दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत १ हजार मिली दुधाला एका दारुच्या बाटलीचा भाव द्या, एवढीच साधी मागणी आपण करणार आहोत,असे ते म्हणाले.    यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची बिले तात्काळ द्यावीत. शेती तुकडेबंदी कायदा रद्द करावी. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांच्या पशुधनास १ रुपयात विमा लागू करावा या व इतर मागण्यांसदर्भात सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले.   भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर आंदोलनाचा इशारा

इंदापूरमधील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे देणे गरजेचे असताना ते दिले नाहीत. त्यामुळे गावगाड्यातील शेतकऱ्याला व त्याच्या पोरांना जागे करून दि.३० जून पर्यंत पैसे न दिल्यास दि. १ जुलै रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्यासमोर आंदोलन करणार आहोत असा इशारा खोत यांनी दिला आहे.

'विच्छा माझी पूर्ण करा' चा पार्ट टू म्हणजे संजय राऊत 

जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू, त्यानंतर स्वतःच भगवा फडकवू, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दादा कोंडकेंचे वगनाट्य होते ' विच्छा माझी पुरी करा' त्या वगनाट्याचा पार्ट टू म्हणजे  संजय राऊत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीGovernmentसरकार