भोर-मांढरदेवी मार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एकजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:31 IST2023-09-25T13:30:17+5:302023-09-25T13:31:08+5:30

खानापूर ( पुणे ) : भोर-मांढरदेवी मार्गावर नेरे गावाच्या हद्दीत चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार, तर दुसरा ...

A person on a two-wheeler was killed in a collision with a four-wheeler on the Bhor-Mandhardevi road | भोर-मांढरदेवी मार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एकजण ठार

भोर-मांढरदेवी मार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एकजण ठार

खानापूर (पुणे) : भोर-मांढरदेवी मार्गावर नेरे गावाच्या हद्दीत चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार, तर दुसरा प्रवासी जखमी झाला. अपघातात दुचाकीवरील सुनील ऊर्फ बापू दिनकर किंद्रे (वय ४० रा. बालवडी) हे ठार झाले; तर हनुमंत दामोदर उल्हाळकर (वय ५९, रा. आंबाडे) जखमी झाले.

या संदर्भात भोर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील दिनकर किंद्रे व हनुमंत दामोदर उल्हाळकर हे शेतात पिकावर फवारणी करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. भोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव तपास करीत आहेत.

Web Title: A person on a two-wheeler was killed in a collision with a four-wheeler on the Bhor-Mandhardevi road