आई व तिच्या प्रियकराने प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा काढला काटा; भुलेश्वर घाटात फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 14:15 IST2023-08-29T14:13:37+5:302023-08-29T14:15:36+5:30

जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे....

A mother and her lover remove the thorn of a son who is an obstacle in love | आई व तिच्या प्रियकराने प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा काढला काटा; भुलेश्वर घाटात फेकला मृतदेह

आई व तिच्या प्रियकराने प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा काढला काटा; भुलेश्वर घाटात फेकला मृतदेह

जेजुरी (पुणे) : आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला व त्याचे प्रेत पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिले. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.

खून झालेल्या मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार असून, त्याची आई रेणू शंकर पवार (वय २०) व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके (वय २१ दोघेही रा.मोडलिंब ता.माढा) या दोघांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षांच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याचे प्रेत साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर घेऊन येऊन ते पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिले. याबाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार, जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्यांच्या प्रेताचे अवशेष शोधून काढले आहेत. या दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.

Web Title: A mother and her lover remove the thorn of a son who is an obstacle in love