अल्पवयीन मुलीवर नराधम काकानेच केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2023 12:41 IST2023-01-23T12:40:56+5:302023-01-23T12:41:07+5:30

काकाच्या मित्रानेही मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

A minor girl was abused by her murderous uncle | अल्पवयीन मुलीवर नराधम काकानेच केला अत्याचार

अल्पवयीन मुलीवर नराधम काकानेच केला अत्याचार

पुणे : आई-वडील ज्याच्या भरवशावर आपल्या १४ व १० वर्षांच्या मुलींना सोपवून गेले होते, त्यानेच घात केला. दोन्ही मुलींवर त्याने बलात्कार केला तसेच त्याच्या मित्रानेही १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी २९ वर्षांचा काका व त्याच्या ४० वर्षांच्या मित्राला अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील आई-वडील दिल्लीला गेले. त्यावेळी मुलींचा काका त्यांच्याकडे राहायला आला. त्याने दोन्ही मुलींवर बलात्कार केला. त्यापूर्वी २० दिवस अगोदर मित्राने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. हा प्रकार शेजारील फिर्यादींना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक नाईक अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: A minor girl was abused by her murderous uncle