बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला नग्न करून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 11:39 IST2022-12-08T11:32:36+5:302022-12-08T11:39:08+5:30

या प्रकरणी तालुका पोलीसांनी तिघांना अटक केली आहे

A medical college student was robbed naked in Baramati | बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला नग्न करून लुटले

बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला नग्न करून लुटले

बारामती : येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने दुचाकीवरून उसाच्या पिकात नेत नग्न फोटो काढत, जबरदस्तीने एटीएम सेंटरमध्ये नेण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि ४) घडला. तत्पूर्वी या २१ वर्षीय विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलीसांनी तिघांना अटक केली आहे.

राहूल धोंडीबा हुगाडे (वय २३, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती), सुमित किशोर पवार (वय २४, रा. बांदलवाडी, ता. बारामती)आणि भूषण भास्कर रणसिंग (वय २०, रा. मार्केट यार्ड रोड, बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

रविवारी हा विद्यार्थी सुभद्रा मॉलमध्ये खरेदी करत कॉलेजकडे निघाला होता. यावेळी रस्त्यात या तिघांपैकी एकाने त्याच्या खिशातील १५ हजार रुपये काढून घेतले होते. त्याचा जाब तो विचारत असताना, दुसऱ्या दुचाकीवरून दोघे तेथे आले. या तिघांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत उसाच्या पिकात नेले. तेथे त्याला नग्न करत, त्याचे शूटिंग व फोटो घेतले. ते व्हायरल करण्याची धमकी देत, एटीएम केंद्रात नेले. तेथे दोन ट्रान्झेक्शनद्वारे त्याच्या खात्यातून १४ हजार ५०० रुपये काढण्यात आले होते. त्याला केलेल्या मारहाणीत त्याच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले होते. या प्रकारामुळे हा विद्यार्थी कमालीचा भयभीत झाला होता. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Web Title: A medical college student was robbed naked in Baramati