पुण्यात क्वार्टर गेट परिसरातील गोदामाला रात्री भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 05:10 IST2022-04-01T05:09:56+5:302022-04-01T05:10:26+5:30

स्पेअर्स पार्ट, फायबरचा कारखाना जळून खाक, एक जण जखमी

A huge fire broke out at a warehouse in the Quarter Gate area of Pune at night | पुण्यात क्वार्टर गेट परिसरातील गोदामाला रात्री भीषण आग

पुण्यात क्वार्टर गेट परिसरातील गोदामाला रात्री भीषण आग

पुणे :  नाना पेठेतील न्यू क्वार्टर गेट चौक परिसरात गोदामाला भीषण आग लागून त्यात बाजूची दुकाने, कारखाना जळून खाक झाला. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत स्पेअर्स पार्टचे दुकान, फायबरचा कारखाना, आंब्याचे गोदाम जळून खाक झाले आहे. मध्यरात्रीनंतर आग विझविण्याचे काम सुरु होते.

नाना पेठेतील आंबेडकर कॉलेज शेजारी कावेरी सोसायटी आहे़ या सोसायटीला लागून गल्लीत अनेक दुकाने, गोदाम आहेत. त्यातील एका गोदामाला रात्री साडेअकरा वाजता भीषण आग लागली. अग्निशामक दलाला याची खबर रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर १० अग्निशामक दलाचे गाड्या, ३ वॉटर टँकर, ३ रुग्णावाकिा घटनास्थळी रवाना झाले. सुमारे ४ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम असून त्याच्या पुढे ३ दुकाने आहेत. या दुकानात गादीचा कारखाना, लाकडी फर्निचर, दुचाकी, चारचाकीच्या स्पेअर्स पार्ट तसेच गाड्यांसाठी लागणाºया फायबरच्या पार्ट बनविणारा कारखाना आहे. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री १ वाजल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत संपूर्ण दुकाने, कारखाना जळून खाक झाला आहे. या आगीत एकाच्या पायाला भाजले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून अजून कुलिंगचे काम बराच वेळ चालणार असल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख सुनिल गिलबिले यांनी सांगितले. या दुर्घटनेच्या  बाजूलाच राजेवाडी झोपडपट्टी येथे मांगीरबाब उत्सव सुरू आहे़ त्यामुळे कार्यकर्ते काम करत जागे होत़े  या कार्यकर्त्यांनी गाड्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन दलाचे अधिकारी जखमी आग विझविण्याचे काम करीत असताना अंधार असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी प्रभाकर उमरटकर यांच्या पायाला कापल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: A huge fire broke out at a warehouse in the Quarter Gate area of Pune at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.