शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

मित्राबरोबर लग्नास नकार दिल्याने मुलीवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 11:47 AM

याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरासह तीन जणांवर गुन्हा दाखल...

कामशेत (पुणे) : मित्राबरोबर लग्न करण्यास नकार दिला, असे म्हणत कामशेत येथील एका मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.३१) सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरासह तीन जणांवर गुन्हा दाखल आहे.

सुनील रामदास ढोरे (वय २२) व अद्वैत ऊर्फ श्री भरत जाधव (वय २३, दोघेही रा. मोरया कॉलनी, वडगाव मावळ, ता. मावळ) यांच्यासह अज्ञात हल्लोखोरावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील इंद्रायणी कॉलनी परिसरामध्ये फिर्यादी सोमवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास इंद्रायणी कॉलनी परिसरातील कचरा टाकण्यास जात होत्या. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या डाव्या कानावर मानेजवळ वार केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या.

यावेळी हल्लेखोर म्हणाला की, माझा मित्र सुनील ढोरे यांच्याशी लग्न करण्यास तू नकार का दिला, असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने पुन्हा धारदार कोयत्याने वार केला. मुलीने तो दोन्ही हाताने अडविला. यामध्ये तिच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे.

पोलिसांनी सुनील ढोरे, अद्वैत जाधव यांना मोठ्या शिताफीने अटक करून कोर्टात हजर केले. त्यावेळी त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीkamshetकामशेतPoliceपोलिसMolestationविनयभंग