Pune Crime: पुण्यात तंबाखू न दिल्याच्या कारणावरून मित्राने केले ब्लेडने वार

By नितीश गोवंडे | Updated: September 2, 2023 16:23 IST2023-09-02T16:22:25+5:302023-09-02T16:23:38+5:30

अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मित्राने तंबाखू न दिल्याच्या कारणावरून त्याच्यावर ब्लेडने वार करण्यात आले...

A friend stabbed him with a blade for not giving tobacco in Pune crime news | Pune Crime: पुण्यात तंबाखू न दिल्याच्या कारणावरून मित्राने केले ब्लेडने वार

Pune Crime: पुण्यात तंबाखू न दिल्याच्या कारणावरून मित्राने केले ब्लेडने वार

पुणे : शहरात दररोज किरकोळ कारणावरून गंभीर मारहणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पोलिसांच्या गस्तीचे प्रमाण कमी असल्याने तसेच रात्रीच्या वेळी अनेक खाण्या-पिण्याची दुकाने, बार सुरू असल्याने देखील या घटना घडत आहेत. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मित्राने तंबाखू न दिल्याच्या कारणावरून त्याच्यावर ब्लेडने वार करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावी वस्ती येथे रवी शाम वाघमारे (३२) याने त्याचा मित्र अमोल बाबुराव ढगे (३३) याला तंबाखू मागितली. यावर अमोलने माझ्याकडे तंबाखू नाहीये असे सांगताच, रवीने खिशातील ब्लेड काढून अमोलच्या डाव्या खांद्याजवळ आणि छातीवर मारून त्याला जखमी केले. याप्रकरणी अमोल ढगे याच्या फिर्यादीवरून रवी वाघमारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रवी हा रेकॉर्डवरील आरोपी असून, याप्रकरणी पोलिसांना त्याला अटक देखील केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक शिंदे करत आहेत.

Web Title: A friend stabbed him with a blade for not giving tobacco in Pune crime news