Pune: डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून वसतिगृहात अश्लील कृत्य; वारजे पाेलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 18:59 IST2024-02-23T18:57:18+5:302024-02-23T18:59:55+5:30

डाॅक्टर तरुणी वारजे भागात एका रुग्णालयात कामाला आहे...

A doctor chases a young woman and commits indecent acts in the hostel; Crime against one by Warje Police | Pune: डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून वसतिगृहात अश्लील कृत्य; वारजे पाेलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

Pune: डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून वसतिगृहात अश्लील कृत्य; वारजे पाेलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

पुणे : डाॅक्टर तरुणीचा पाठलाग करून अश्लील कृत्य करण्यात आल्याची घटना वारजे भागातील एका रुग्णालयाच्या वसतिगृहात घडली. याबाबत २६ वर्षीय डाॅक्टर तरुणीने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून २० ते २२ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाॅक्टर तरुणी वारजे भागात एका रुग्णालयात कामाला आहे. रुग्णालयाच्या वसतिगृहात ती राहायला आहे. आरोपी तरुणाने डाॅक्टर तरुणीचा पाठलाग केला. वसतिगृहाच्या आवारात रात्री सव्वाआठच्या सुमारास तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पसार झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

Web Title: A doctor chases a young woman and commits indecent acts in the hostel; Crime against one by Warje Police