खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढल्यास गुन्हा दाखल होणार;‘एआय’मुळे खोटी माहिती सादर करण्याचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:59 IST2026-02-11T16:58:32+5:302026-02-11T16:59:54+5:30

खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार

A crime will be registered if a passport is issued by providing false information; the rate of submitting false information has increased due to ‘AI’ | खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढल्यास गुन्हा दाखल होणार;‘एआय’मुळे खोटी माहिती सादर करण्याचे प्रमाण वाढले

खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढल्यास गुन्हा दाखल होणार;‘एआय’मुळे खोटी माहिती सादर करण्याचे प्रमाण वाढले

पुणे : परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढताना काही जणांनी खोटी माहिती पासपोर्ट कार्यालयाला सादर केली. याचा त्रास खरी माहिती देणाऱ्याला होत आहे, तसेच अलीकडे ‘एआय’मुळे खोटी माहिती सादर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशारा पुणे विभागीय पारपत्र अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी (दि.१०) आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पारपत्र अधिकारी श्रुती पांडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, पारपत्र कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी जतीन पोटे आदी उपस्थित होते.

डॉ. गायकवाड म्हणाले की, पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज आता पूर्ण डिजिटल झाले असून, अपॉइंटमेंटपासून ते पासपोर्ट मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होते. शासनाने निर्धारित केलेली कागदपत्रे योग्य प्रकारे सादर केल्यास पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया सोपी व जलद होते. मात्र, अनेक अर्जदार आधी अर्ज भरतात आणि नंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करतात. त्यामुळेच पासपोर्ट मिळण्यात अडचणी निर्माण होतात. आमचे उद्दिष्ट ३० दिवसांत अर्जदाराच्या घरी पासपोर्ट पोहोचविण्याचे आहे. काही प्रकरणांत तसे झालेही आहे. मात्र, बहुतांश वेळा अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यामुळे विलंब होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

------------

आर्थिक देवाणघेवाण करू नये :

नागरिकांची पोलिस पडताळणी ही आमच्या अखत्यारीत नसून ती स्वतंत्रपणे पोलिस यंत्रणेमार्फत केली जाते. गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पासपोर्ट मिळू नये, यासाठी पोलिस पडताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, या प्रक्रियेत कुठेही आर्थिक व्यवहार होऊ नये. शिवाय नागरिकांनी पासपोर्ट मिळविण्यासाठी कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करू नये, असेही ते म्हणाले. 

गुंड नीलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला?

कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर डॉ. गायकवाड म्हणाले की, पोलिस पडताळणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पासपोर्ट दिला जातो. कोणत्याही गुन्हेगाराला जाणीवपूर्वक पासपोर्ट दिला जात नाही. भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title : झूठी जानकारी से पासपोर्ट बनवाने पर मामला दर्ज; एआई से धोखाधड़ी बढ़ी

Web Summary : गलत पासपोर्ट जानकारी देने पर आपराधिक मामला दर्ज होगा। एआई के कारण धोखाधड़ी बढ़ी। पुलिस सत्यापन महत्वपूर्ण, पासपोर्ट के लिए वित्तीय लेनदेन से बचें। झूठे दस्तावेजों पर होगी कार्रवाई।

Web Title : False Passport Information Leads to Charges; AI Increases Fraud

Web Summary : Providing false passport information now leads to criminal charges. Increased AI usage facilitates fraudulent submissions. Police verification is crucial, avoid financial transactions for passport assistance. Action against fake documents assured.