Pune: बलात्कार करून तरुणीला मारहाण, ग्रामीण पोलिस दलातील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 14:24 IST2024-01-20T14:24:01+5:302024-01-20T14:24:30+5:30

याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने पुण्यात फिर्याद दिली...

A case of rape has been registered against a policeman, a complaint of a 20-year-old girl | Pune: बलात्कार करून तरुणीला मारहाण, ग्रामीण पोलिस दलातील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Pune: बलात्कार करून तरुणीला मारहाण, ग्रामीण पोलिस दलातील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

बारामती (पुणे) :पुणे मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने पुण्यात फिर्याद दिली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ नामदेव कोळेकर (वय ४०, रा. एमआयडीसी, बारामती) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, बारामती शहरातील अशोकनगर भागात ही तरुणी राहत होती. कोळेकर यांनी तिला केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तिच्याशी इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. तिला हाताने मारहाण केली. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून ही तरुणी बारामतीतून पुणे येथे निघून गेली असता कोळेकर यांनी तिच्या बहिणीला फोन व मेसेज करत आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, कोळेकर यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा आंबेगाव पठार येथून बारामती शहर पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे. तपास सुरू असून, अद्याप याप्रकरणी कोळेकर यांना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले.

Web Title: A case of rape has been registered against a policeman, a complaint of a 20-year-old girl