Pune | लोणावळा एअरफोर्स परिसरात ड्रोन उडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:54 IST2022-11-14T16:54:14+5:302022-11-14T16:54:47+5:30
ड्रोन उडविल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Pune | लोणावळा एअरफोर्स परिसरात ड्रोन उडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
लोणावळा (पुणे) :लोणावळा एअरफोर्स परिसरात विनापरवाना ड्रोन उडविल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम १८८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एअरफोर्सचे पोलीस नोहंमद अर्शद आलम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल बालकृष्ण बडोले (रा. मुंबई) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.१३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. लोणावळ्यात एअरफोर्स व आयएनएस शिवाजी ही संवेदनशील ठिकाणे असताना देखील या भागात सदर व्यक्तीने जिल्हाधिकारी यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ड्रोन उडविला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते घातक असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी देखील याभागात प्री वेडिंग शूटिंगसाठी ड्रोन उडविल्याप्रकरणी काही गुन्हे दाखल आहेत. पोलीस नाईक शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.