Pune: गावठी पिस्तूल बाळगल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल, चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:47 IST2024-02-23T17:47:10+5:302024-02-23T17:47:40+5:30

एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे....

A case has been registered against three persons for possessing village pistol, action taken on Chakan-Shikrapur road | Pune: गावठी पिस्तूल बाळगल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल, चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कारवाई

Pune: गावठी पिस्तूल बाळगल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल, चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कारवाई

चाकण (पुणे) : बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी चाकण - शिक्रापूर रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयाच्या गेटवर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एकास जेरबंद केले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी राजेश व्यंकटी वाडेकर (वय २२, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. मरवाळी, ता. नायगाव, जि. नांदेड), विशाल वाजे (रा. रासे, ता. खेड), मेहबूब शेख (रा. वाकी, ता. खेड) या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील राजेश वाडेकर यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: A case has been registered against three persons for possessing village pistol, action taken on Chakan-Shikrapur road