Pune: जातिवाचक शिवीगाळप्रकरणी माजी नगरसेवक गणेश ढोरेविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 08:37 IST2023-06-19T08:36:23+5:302023-06-19T08:37:38+5:30

जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी...

A case has been filed against former corporator Ganesh Dhore in caste abuse case | Pune: जातिवाचक शिवीगाळप्रकरणी माजी नगरसेवक गणेश ढोरेविरोधात गुन्हा दाखल

Pune: जातिवाचक शिवीगाळप्रकरणी माजी नगरसेवक गणेश ढोरेविरोधात गुन्हा दाखल

पुणे : प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून एका व्यक्तीला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी माजी नगरसेवक गणेश बाळासाहेब ढोरे (वय ३५, रा. भेकराईनगर) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, तसेच सागर पोट्रे (वय २६, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) आणि प्रणव ढमाले (वय २६, रा. भेकराईनगर) यांच्याविरोधात मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, ढोरे फुरसुंगी भागातील माजी नगरसेवक आहेत. त्यांनी प्रभागात केलेल्या कामांबाबत एका पत्रकाराने तक्रार केली होती. त्यामुळे ढोरे यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी ढोरे यांनी पोट्रे आणि ढमाले यांना सांगून तक्रारदारांना मारहाण केली. दोघांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख तपास करत आहेत.

Web Title: A case has been filed against former corporator Ganesh Dhore in caste abuse case