Pune News: कात्रज घाटात कारने दुचाकीला उडवले, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 18:11 IST2024-05-14T18:10:46+5:302024-05-14T18:11:11+5:30
पुणे : कात्रज घाटात भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या कारच्या धडकेने आणखी दोन कारचे नुकसान झाले. याप्रकरणी कारचालक ...

Pune News: कात्रज घाटात कारने दुचाकीला उडवले, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे :कात्रज घाटात भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या कारच्या धडकेने आणखी दोन कारचे नुकसान झाले. याप्रकरणी कारचालक अर्जुन बबन चोरगे (वय ५१, रा. कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात वैभव गोसावी (वय ४२, रा. शिंदेवाडी, ता. भोर) हा तरुण जखमी झाला. याबाबत चोरगे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, वैभव गोसावी हे दुचाकीवरून जात असताना सोमवारी (दि.१३) सायंकाळी पाचच्या सुमारास भिलारेवाडी परिसरात भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात गोसावी यांना दुखापत झाली. नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने कात्रज घाटातून निघालेल्या अन्य दोन कारला धडक दिली. उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करीत आहेत.