लोहगावात ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत ७२ वर्षांच्या नराधम ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:57 IST2025-10-16T17:56:01+5:302025-10-16T17:57:59+5:30
चिमुकली घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये आरोपी अश्लील व्हिडीओ पाहायचा, तसेच ते पाहून तिच्याशी अश्लील चाळे करीत होता

लोहगावात ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत ७२ वर्षांच्या नराधम ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य
पुणे: लोहगाव भागातील एका भागात राहणाऱ्या सात वर्षांच्या चिमुकलीला घरी बोलवून नराधमाने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठाच्या कुटुंबातील चिमुकलीनेच हा प्रकार समोर आणला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
तक्रारदार व आरोपीचे कुटुंबीय एकाच भागात राहतात. तक्रारदारांची सात वर्षांची मुलगी आहे. ती आरोपीच्या घरी खेळण्यास जात असत. तिथेही एक लहान मुलगी आहे. त्यामुळे ती जात असे. दरम्यान, चिमुकली घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये आरोपी अश्लील व्हिडीओ पाहायचा. तसेच, ते पाहून तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. हा प्रकार मुलीने पाहिला. गेल्या आठवड्यात आरोपीच्या घरातील मुलगी पीडित कुटुंबीयांकडे आली व तिने संबंधित प्रकार त्यांना सांगितला. तसेच, तिला आमच्या घरी पाठवत जाऊ नका असे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा ती खूप घाबरलेली असल्याचे दिसून आले. नंतर तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सर्व घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे जात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.