Pune crime | चासकमान कालव्यात पडून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 21:50 IST2022-10-07T21:46:43+5:302022-10-07T21:50:01+5:30

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद....

A 60-year-old man died after falling into the Chasakman canal pune crime news | Pune crime | चासकमान कालव्यात पडून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Pune crime | चासकमान कालव्यात पडून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

केंदूर (पुणे) : करंदी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात पडून सोमनाथ गंगाराम माने (वय ६०) या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करंदी येथील सोमनाथ माने हे पाच ऑक्टोबर रोजी बाहेर गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत तर आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना करंदी फाटा येथील चासकमान कालव्यात एक इसम पडून मृत्यू झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, पोलीस शिपाई अंबादास थोरे, पोलीस पाटील वंदना साबळे आदींनी सदर ठिकाणी जात पाहणी करुन मृतदेह बाहेर काढला. सोमनाथ गंगाराम माने यांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले, याबाबत कैलास सोमनाथ माने यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली.

Web Title: A 60-year-old man died after falling into the Chasakman canal pune crime news