चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमाला अटक

By नितीश गोवंडे | Updated: October 30, 2023 15:30 IST2023-10-30T15:29:11+5:302023-10-30T15:30:07+5:30

आरोपीवर विनयभंगाच्या कलमासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

A 55 year old murderer arrested for sexually assaulting a child | चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमाला अटक

चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमाला अटक

पुणे : एका ३ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ५५ वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (२८ ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास फुरसुंगी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यशवंत काळुराम जाधव (५५, रा. फुरसुंगी) याच्यावर विनयभंगाच्या कलमासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यशवंत जाधव एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी आरोपीच्या नातीसोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने त्यांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक खळदे करत आहेत.

Web Title: A 55 year old murderer arrested for sexually assaulting a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.